पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंधेरीत विचित्र कार अपघातात ८ जण जखमी

घटनास्थळाचे छायाचित्र

मुंबईत अंधेरी भागात मंगळवारी रात्री उशीरा झालेल्या विचित्र अपघातात तीन मोटारींमधील ८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Mumbai Rains LIVE : मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

मुंबईत मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. यामुळे दृश्यमानताही कमी झाली आहे. त्यातच अंधेरीमध्ये वेगाने आलेल्या एका इनोव्हा गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती समोरून येणाऱ्या स्वीफ्ट गाडीला जाऊन धडकली. यानंतर ती परत समोरून येत असलेल्या झायलो गाडीलाही धडकली. इनोव्हाची ही धडक इतकी जोरदार होती की गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. 

तिन्ही गाड्यांतील प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.