पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घाटकोपर: वाढदिवसाच्या दिवशीच युवकाची हत्या

घाटकोपर येते हत्या झालेल्या ठिकाणी तपास करताना पोलिस अधिकारी (ANI)

वाढदिवसादिवशीच एका २७ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना घाटकोपर येथे घडली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून मृत युवकाच्या वाढदिवसाच्या पार्टीतच ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येते. सुमारे ७ ते ८ जणांच्या जमावाने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. बंटी उर्फ नितेश सावंत असे मृत युवकाचे नाव असून तो शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येते.

या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नितेशच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. त्याचवेळी अचानक ७ ते ८ जणांचा जमाव तिथे आला आणि त्यांनी या नितेश सावंतवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. काही कळायच्या आत नितेश त्याची हत्या केली. नितेशचे चार-पाच दिवसांपूर्वी काहीजणांसोबत भांडण झाले होते अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली आहे.

पिंपरीतील भोसरीमध्ये ३ मुलांची हत्या करुन आईची आत्महत्या

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mumbai 27 year old man killed by 7 to 8 people during his birthday celebrations last night in Ghatkopar