राज्यातील कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने वाढत असून मुंबई सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णात सोमवारी आणखी भर पडली. या परिसरातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टि झाली असून धारावीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४९ वर जाऊन पोहचला आहे. आतापर्यंत या ठिकाणी ५ लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावलाय.
Good News: १५ राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण
देशात कोरोना विषाणूची लागण झालेले सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्र राज्यात आढळले असून मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा चिंताजनकरित्या वाढत आहे. धारावी परिसरातील कोरोनाग्रस्तांमुळे सरकार आणि प्रशासनाच्या अडचणीत आणखी वाढल्या आहेत. धारावीतील कोरोनाच्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉक्टरांचे पथक घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी करत आहे. परिसर संपूर्ण सील करण्यात आला असून ड्रोनच्या माध्यमातून याठिकाणी नजर ठेवण्यात येत आहे.
चीन, ब्रिटनपेक्षा न्यूयॉर्कमध्ये कोरोना रुग्ण जास्त,७००० जणांचा मृत्यू
राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी हा १४ एप्रिलवरून आता ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काही भागात पूर्वीपेक्षाही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते. यासंदर्भात राज्यसरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.