पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मुंबई मेट्रो'च्या एमडी अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती

अश्विनी भिडे

मेट्रो-३च्या आरेतील कारशेडप्रकरणी वादात अडकलेल्या मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना राज्य सरकारने बढती दिली आहे. भिडे यांची प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

औरंगाबाद महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सेनेचे राजेंद्र जंजाळ

आरेतील कार शेडप्रकरणी शिवसेना आणि अश्विनी भिडे यांच्यात शीतयुद्ध रंगले होते. आरेतील कार शेडला शिवसेनेचा विरोध होता. परंतु, अश्विनी भिडे यांनी आरेत कार शेड उभारणे व्यवहार्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मोठा वाद झाला होता. आदित्य ठाकरे यांनी त्यासंबंधी टि्वटही केले होते. 

मातीला आकार देणार्‍या हातांकडून मराठी साहित्य संमेलनाला ५ लाखांची मदत

त्यामुळे नवे सरकार आल्यानंतर भिडेंबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, राज्य सरकारने पहिली पदोन्नती अश्विनी भिडे यांना दिली आहे. या बढतीतून सरकारने हे स्थगिती सरकार नसल्याचा अप्रत्यक्षरित्या संदेशही त्यांनी दिला असल्याचे बोलले जाते. 

प्रणिती शिंदेंना डावलले, काँग्रेसच्या महिला नगरसेविकेचा राजीनामा

भिडे यांना बढती मिळाली असली तरी त्यांच्याकडे मेट्रोचे संचालकपद कायम राहणार आहे. मेट्रो प्रकल्प मुंबईसाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी अभ्यासू आणि अनुभवी अधिकाऱ्याची गरज असल्याने सरकारने त्यांच्यावरील जबाबदारी कायम ठेवली आहे.