पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील पूरस्थितीमुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

मंत्रालय

पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरामध्ये महापूर आला आहे. राज्यातील पूरस्थिती पाहता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी एमपीएससी परीक्षा होणार होती. मात्र सरकारने 24 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

आमदार बच्चू कडू यांचा दिल्लीत मोर्चा; महाराष्ट्र सदन घेतले ताब्यात

कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमध्ये अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे या भागातून वाहणाऱ्या नद्यांना महापूर आला आहे. पूराचे पाणी गावामध्ये शिरल्यामुळे या जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. पूरामध्ये अद्याप अनेक नागरीक अडकले आहेत. त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरु आहे. सध्या जिल्हा प्रशासन, एनडीआरएफची टीम, लष्कराचे जवान, नौदलाचे जवान, वायू दलाचे जवानांकडून बचावकार्य सुरु आहे. 

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण; तिन्ही आरोपींना जामीन