पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घोडबंदर येथे ट्रक-दुचाकीच्या अपघातात माय-लेकींचा मृत्यू

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

ठाण्यामध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये माय-लेकींची मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. 

३७१ कलमाबद्दलही बोला, शरद पवारांचा भाजपला प्रश्न

घोडबंदर रोड येथील ब्रम्हांड फेज येथे राहणारे दिलीप विश्वकर्मा पत्नी आणि मुलीला दुचाकीवरुन घेऊन जात होते. रात्री साडे दहाच्या सुमारास घोडबंदर रोड परिसरातील भाईंदरपाडा येथे भरधान ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये विश्वकर्मा यांची पत्नी आणि तीन वर्षाची मुलगी खाली पडली. ट्रकने विश्वकर्मा यांच्या पत्नीला चिरडले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली. 

वाहन उद्योगाचे बुरे दिन अद्याप कायम, विक्रीचा आलेख खालच्या दिशेने

गंभीर जखमी झालेल्या मुलाला ताबडतोबत रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या अपघातामध्ये विश्वकर्मा देखील जखमी झाले आहेत. अपघातानंतर कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पळून गेलेला ट्रकचालक चंद्रशेखर बिष्णोई याला पोलिसांनी अटक केली. दिलीप विश्वकर्मा हे एका खासगी कंपनीत कामाला होते. तर त्यांची पत्नी चंद्रावती या शिक्षिका होत्या. या घटनेमुळे विश्वकर्मा कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या संस्थांवर छापे; ४.५२ कोटी