पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कामोठे दुहेरी हत्याकांडाने हादरले; आरोपीला अटक

पिंपरी बलात्कार आणि हत्या प्रकरण

नवी मुंबईतील कामोठे येथे दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा कामोठे येथे एक महिला आणि तिच्या दोन वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली. जयश्री चव्हाण (२२ वर्ष) आणि अविनाश चव्हाण (२ वर्ष) अशी हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत. या हत्येप्रकरणी कामोठे पोलिसांनी सुरेश चव्हाण याला अटक केली आहे. आरोपी जयश्री चव्हाण यांचा दिर आहे. 

काश्मीर भारताचेच! जिनेव्हात पाक परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य

कामोठे येथील सेक्टर ३४ मध्ये ही घटना घडली आहे. याठिकाणी असलेल्या एकदंत सोसायटीमध्ये जयश्री चव्हाण पती आणि मुलासोबत राहत होती. सोमवारी रात्री उशिरा आरोपी जयश्री चव्हाण यांच्या घरी आला. घरामध्ये भाऊ नसल्याचे पाहून तो घरामध्ये शिरला. आधी त्याने वहिणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तीने विरोध केल्यानंतर त्याने धारधार शस्त्राने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मुलाची देखील हत्या केली.

पक्षांतर्गत वादाचा बळी; उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसचा राजीनामा

त्यानंतर घराचा दरवाजा बंद करुन आरोपी मृतदेहा शेजारीच बसून राहिला. जयश्री यांचा नवरा घरी आला असता त्याने दरवाजा वाजवला. दरवाजा न उघडल्यामुळे त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला असता जयश्री आणि तिचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. 

तयारी विधानसभेची!, शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

याप्रकरणी कामोठे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत सुरेश चव्हाण याला अटक केली. छोट्या भावाने घराबाहेर काढल्याचा जुना राग आल्यामुळे आरोपीने हे कृत्य केले असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे कामोठेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

'भारताच्या दबावामुळेच श्रीलंकन खेळाडू पाकमध्ये खेळण्यास तयार नाहीत'