पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवभोजन थाळीची चव चाखणाऱ्यांची संख्या दोन लाखांपार

अजित पवार शिवभोजन थाळीच्या शुभारंभप्रसंगी

गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात 'शिवभोजन' योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. ११ फेब्रुवारी रोजी योजनेच्या अंमलबजावणीला १७ दिवस पूर्ण झाले. या १७ दिवसांच्या काळात राज्यात २ लाख ३३ हजार ७३८ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.

मुंबई हल्ल्यातील सूत्रधार हाफिज सईदला पाक कोर्टाने सुनावली शिक्षा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या 'शिवभोजन योजने'ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रजासत्ताकदिनी योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ  दिवसांच्या कालावधीतच म्हणजे २ फेब्रुवारी २०२० पर्यंतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या १ लाखांहून अधिक (१ लाख ५ हजार ८८७)  झाली होती. आता ११ फेब्रुवारीपर्यंत त्यात आणखी एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांची वाढ झाली आहे.

योजनेच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष

शिवभोजन योजनेत जेवण देतांना स्वच्छता, टापटीप आणि जेवणाचा दर्जा उत्तम राहावा, यासाठी उद्धव ठाकरे स्वत: या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत. शिवभोजन केंद्रातून नागरिकांना चांगले आणि सकस जेवण मिळावे यासाठी ते आग्रही आहेत. याच उद्देशाने त्यांनी काही दिवसांपूर्वी योजना सुरु झाल्यानंतर शिवभोजन केंद्रात जेवण घेत असलेल्या नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून थेट संवाद साधला होता.

... अन् कोर्टात निर्भयाच्या आईला अश्रू अनावर

जिल्हा रुग्णालये, बस तसेच रेल्वे स्थानक परिसर, शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे गरीब आणि गरजू लोकांना, मजूरांना याचा लाभ घेणे शक्य झाले आहे. दर दिवशीच्या थाळींच्या संख्येत वाढ होतांना दिसत असून पहिल्या दिवशीची ११३०० थाळींची संख्या आता १४६३९ वर पोहोचली आहे. या योजनेत राज्यात १३९ शिवभोजन केंद्रे सुरु झाली आहेत.