पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरेरे! मुंबईत वरुणराजाचे उशीराने आगमन, स्कायमेटचा अंदाज

मुंबईतील पाऊस

घामाच्या धारांनी वैतागलेल्या मुंबईकरांना यंदा पावसाचा सहवास लवकर मिळणार नसल्याची चिन्हे आहेत. हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या खासगी कंपनी 'स्कायमेट'ने दिलेल्या माहितीनुसार यंदा मुंबईत पावसाचे आगमन नेहमीपेक्षा उशीराने होईल. मुंबईत साधारणपणे ८ ते १० जूनच्या दरम्यान पाऊस सुरू होतो. पण यंदा मान्सूनचे आगमन होण्यास साधारण १० दिवसांचा वेळ लागू शकतो. मुंबईत १५ ते १८ किंवा उशीरात उशीरा २० जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे.

पावसाळ्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज, २५०० CCTV कॅमेऱ्यांनी सतत लक्ष

गेल्यावर्षी मुंबईत ९ जून रोजी मान्सूनचे अधिकृतपणे आगमन झाले होते. पण यंदा पाऊस उशीराने येणार असून तो सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज असल्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढच झाली आहे. तलावांत पाणीसाठा कमी असल्यामुळे मुंबईत १० टक्के पाणी कपात सध्या सुरू आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये मिळून १२ मेपर्यंत केवळ १५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा चांगला पाऊस पडण्याची खूप गरज असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्रातील अनेक भागात तीव्र दुष्काळ आहे. त्यातच स्कायमेटने जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. पॅसिफिक महासागरातील एल निनो घटकामुळे यंदा मान्सूनचे उशीराने आगमन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

धक्कादायक!, देशात यंदा मान्सून पूर्व पावसात २९ टक्के घट

स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत म्हणाले, जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या आगमनास जे घटक कारणीभूत असतात, ते सद्यस्थितीत दिसत नाहीत. त्यामुळेच मान्सूनच्या आगमनास साधारणपणे एक आठवड्याचा उशीर होऊ शकतो. मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्यासही उशीर होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात जून आणि जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये त्यात सुधारणा होऊ शकते, असेही पलावत यांनी सांगितले.