पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Rain: मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत जोरदार पाऊस

मुंबईसह कोकणामध्ये पुढील चार तासांत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईकरांनी सतर्क रहावे, असे ट्विट मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन केले आहे. 

मुंबई-ठाण्यात सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. संध्याकाळपासून पावसाचा जोर आणखीनच वाढला होता. पुढच्या तासांत मुंबईत पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं असून गणेश विसर्जनासाठी चौपाट्यांवर आलेल्या गणेश भक्तांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात देखील पावसाने जोर धरला असून मुसळधार पाऊसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. कोलशेत, ब्रह्मान्ड, घोडबंदर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात  पाणी साचले आहे. या बरोबरच भाईंदर, वसई, विरार पट्ट्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे.