पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चेंबूरमध्ये अंत्ययात्रेवेळी जमाव संतप्त; तुफान दगडफेक

चेंबूरमध्ये अंत्ययात्रेवेळी जमाव संतप्त; तुफान दगडफेक

बेपत्ता मुलीचा पोलिसांनी शोध न घेतल्याने तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने चेंबूर येथील सायन-पनवेल महामार्गावर रास्तारोको करत दगडफेक केली. संतप्त जमावाने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही मारहाण केली. या घटनेमुळे चेंबूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...

चेंबूर येथे राहणारी एक मुलगी गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. पोलिसांनी यात लक्ष न घातल्याने तिचा शोध न लागल्यामुळे या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी या व्यक्तिची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या तरुणांनी सायन-पनवेल महामार्गावर अचानक दगडफेक करत रास्तारोको केला. काही क्षणातच सायन-पनवेल महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. जमावाने काही गाड्यांवर आणि दुकानांवरही दगडफेक केली.

परस्पर सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही-कोर्ट