पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेचा 'ठाणे बंद' स्थगित, राज ठाकरेंचे आदेश

मनसे प्रमुख राज ठाकरे

कोहिनूर मिलची जमीन खरेदी प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नोटीस बजावून २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याविरोधात याच दिवशी ठाणे बंदची हाकही त्यांनी दिली होती. मात्र, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हा बंद मागे घेण्यात आला आहे. मनसेचे पदाधिकारी अविनाश जाधव यांनी याची माहिती दिल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. 

आमच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याने २२ ऑगस्ट रोजी बंद पुकारला होता. परंतु, राज ठाकरे यांनी मला फोन करुन बंद मागे घेण्यास सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होईल, असे कृत्य करु नका, असे त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही बंद मागे घेत आहोत, अशी माहिती अविनाश जाधव यांनी 'एएनआय'ला दिली.

'आरोपांमध्ये तथ्य नसल्यास राज ठाकरेंना सोडलं जाईल'

दरम्यान, कोहिनूर मिल प्रकरणातील आर्थिक व्यवहार प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची ईडीने सात तास कसून चौकशी केली. चौकशी समाधानकारक झाल्याचे उन्मेष जोशींनी म्हटले आहे. याप्रकरणात ईडीसमोर पुन्हा हजर रहावे लागणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.  

कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी त्यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली होती. उन्मेष जोशी सोमवारी दुपारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. सायंकाळी ७ वाजता ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. ईडीने केलेल्या चौकशीने आपण समाधानी आहोत. त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.  

राज ठाकरेंच्या चौकशीबाबत काहीच वाटत नाही, संजय राऊतांचे वक्तव्य

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर आपले मत व्यक्त केले. राज ठाकरेंना ईडीने नोटीस कशासाठी पाठवली आहे याबाबत मला काहीच माहिती नाही. त्यांना नोटीस पाठवली असल्याचे मला माध्यमातून समजले. ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यांचे काम स्वतंत्र पध्दतीने चालते. तिचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही. ईडीकडून चौकशा सुरुच असतात. त्यात सूडबुध्दीचा संबंध येत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.