पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल; मनसेचा वारिस पठाणांना इशारा

राज ठाकरे आणि वारिस पठाण

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिला आहे. 'आम्ही...' 'तुम्ही...' असले भेद आम्हाला मान्य नाहीत', असे मनसेने खडसावू सांगितले आहे. वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरुन सध्या राजकारण तापले आहे. सर्व राजकीय पक्षांकडून एमआयएमवर टीकेची झोड सुरु झाली आहे. 

आमचे १५ कोटी, १०० कोटींवर भारी; वारिस पठाणांचे वादग्रस्त

मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत वारिस पठाणांना इशारा दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की,'आम्ही...' 'तुम्ही...' असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण.... 'आम्ही' इतके, 'तुम्ही' तितके... अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना 'आम्ही' इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल!' असा इशारा मनसेने दिला आहे. 

'...तरीही शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करणारच!'

दरम्यान, कर्नाटकातील गुलबर्गा येथे एका सभेला संबोधित करताना वारिस पठाण यांनी सांगितले की, 'आम्ही १५ कोटी आहोत पण १०० कोटींवर भारी आहेत. हे लक्षात ठेवा. तसंच, 'आम्ही वीटेचे उत्तर दगडाने द्यायला शिकलो आहोत. आता आपल्याला एकत्र चालावे लागणार आहे. स्वातंत्र्य मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्यावे लागेल. ते म्हणतात की आम्ही बायकांना पुढे केलंय. पण आता फक्त वाघिणीच बाहेर आल्या आहेत तर तुम्हाला घाम फुटतोय. पण आम्ही सर्वजण एकत्रित आलो तर काय होईल हे समजून घ्या.' अस देखील वारिस पठाणानी म्हटले आहे. 

मी 'असे' वक्तव्य केलेच नाही; इंदोरीकर महाराजांचा खुलासा