पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वांद्र्यातील घुसखोरांचे मोहल्ले आधी साफ करा, मनसेची मातोश्रीसमोर पोस्टरबाजी

मनसे पोस्टरबाजी

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना मुंबईतून हाकलवून लावण्याचा पवित्रा हाती घेतलेल्या मनसेने मुंबईत ठिकठिकाणी पोस्टरबाजी केली आहे. ९ फेब्रुवारी रोजी घुसखोरांविरोधात मनसेचा मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे. या मोर्चावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोस्टरद्वारे मनसेने उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यासमोरच मनसेने पोस्टर लावले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून मनसेने 'वांद्र्यातील घुसखोरांनी भरलेले मोहल्ले आधी साफ करा', असे आव्हान केले आहे.

काहीतरी गडबड आहे, शाहिन बाग प्रकरणात सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

'बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकला ही भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे. उगाच श्रेय घेऊ नये, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी मनसेवर केली होती. याला मनसेने पोस्टरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. मातोश्रीच्या समोरच मनसेचे उपविभाग अध्यक्ष अखिल चित्रे यांनी पोस्टर लावले आहे. या पोस्टर त्यांनी असे लिहेले आहे की, 'माननीय मुख्यमंत्री साहेब, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकलंच पाहिजे, हीच आपली भूमिका असेल तर प्रथम आपल्याच वांद्र्यातील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा.', असे आव्हान त्यांनी केले आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७०० कोटींचे अतिरिक्त वाटप, हायकोर्टात माहिती

दरम्यान, याआधी मनसेने पनवेलमध्ये घुसखोरांविरोधात पोस्टर लावले होते. 'पनवेलमधील बांगलादेशींना निर्वाणीचा 'मनसे' इशारा...चालते व्हा...नाहीतर मनसे स्टाइल धडा शिकवला जाईल.', असे या पोस्टरवर लिहिण्यात आले होते. तर, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात येत्या ९ फेब्रवारी रोजी म्हणजे रविवारी मनसेचा मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे. पोलिसांनी परवानगी दिलेल्या नव्या मार्गावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. बेकायदा बांगलादेशींना भारतातून हाकला हीच आमची भूमिका असल्याचे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. 

हिंदू महासभा नेत्याच्या हत्येप्रकरणी पत्नीसह तिघांना अटक