पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ठाणेकरांच्या टोलमुक्तीसाठी मनसे आक्रमक

मनसे आंदोलन

ठाणेकरांच्या टोलमुक्तीसाठी मनसेकडून आंदोलन सुरु आहे. ठाणेकरांना टोलमुक्ती द्यावी या मागणीसाठी मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामध्ये ठाणे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. 

जेव्हा नासाने मानली हार तेव्हा चेन्नईच्या इंजिनिअरने शोधला 'विक्रम'

आनंदनगर टोलनाका येथे मनसे कार्यकर्त्यांकडून धरणे आंदोलन सुरु आहे. मनसेने सोमवारी साखळी आंदोलन केले. आज शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करत टोलला विरोध केला जात आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. याआधी ९ नोव्हेंबर रोजी मनसेने आंदोलन केले होते. 

माहिम समुद्रकिनाऱ्यावर सुटकेसमध्ये सापडले मानवी शरिराचे तुकडे

नोकरीनिमित्त ठाण्यावरुन मुंबईमध्ये आणि पुन्हा मुंबईतून ठाण्यात जाण्यासाठी रोज ठाणेकरांना टोल भरावा लागतो. यामुळे ठाणेकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठाणेकरांना टोलमुक्ती द्यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र टोलमाफी न झाल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरु केले आहे. 

धक्कादायक, पुण्यात सिंहगड रस्त्यावर आढळला तरुणीचा