पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसे हिंदुत्वाची कास धरणार?, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

मनसे राज्यव्यापी अधिवेशन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुरुवारी, २३ जानेवारीला मुंबईत राज्यव्यापी महाअधिवेशन होते आहे. गोरेगावमध्ये होणाऱ्या या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनाच्या तयारीचे मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर  लावण्यात आले आहे, या पोस्टरबाजीमध्ये भगव्या रंगाची झलक पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील पटलावर नवी सुरुवात करण्यासाठी राज ठाकरे हिंदुत्वाची कास धरणार का, यावरून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क मांडले जात आहेत.

राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अनिवार्य

या अधिवेशनाआधी मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून झेंडा हटवण्यात आहे. मनसेचा झेंडा हटवून तिथे केवळ पक्षाचं चिन्ह दिसत आहे. २०१४ मधल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तर मनसेचा केवळ एकच उमेदवार निवडून आला. या मोठ्या अपयशानंतर मनसे आता हिंदुत्वाची कास धरेल अशी चर्चा आहे. सध्या शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरमधील झलक पाहता चर्चांना उधाण आलं आहे.

या अधिकाऱ्यांच्या बदलीची चर्चा तर होणारच!

केवळ हिंदूच नाही तर अल्पसंख्यकांना सोबत घेऊन चालण्याचं धोरण राज ठाकरेंनी आखलं. मात्र स्थापनेनंतर पहिल्यांदाच पक्ष घेत असलेल्या नव्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागून आहे. राज्यात हिंदुत्त्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना पक्षानं २०१९ च्या निवडणुकानंतर आपल्या भूमिकेस काहीशी मुरड घातली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या 'सेक्युलर' पक्षाशी युती केल्यानंतर हिंदुत्त्ववादाचा मुद्दा शिवसेनेनं काही हात दूर ठेवल्याचं पाहायला मिळाले. तर हिंदुत्त्ववादाचा पुरस्कार करणारा भाजपासारखा देशातील सर्वात मोठ्या पक्षानंही आता 'सेफ गेम' खेळायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप सध्या विरोधी बाकावर आहे, त्यामुळे भविष्याची दिशा पाहता भगव्याची कास धरून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्यानं सारीपाट खेळायला राज ठाकरेंचा मनसे पक्ष तयार झाला आहे, असे दिसते. या पार्श्वभूमीवर मनसेच्या अधिवेशनात राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता राजकारणापासून ते सर्वसमान्य जनतेला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:MNS new posters and videos of the party has emerged and they hint towards a major to adopt Hindutva