पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसे मोर्चा ! हे मार्ग वाहतुकीसाठी बंद तर या ठिकाणी 'नो पार्किंग'

मनसेच्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल

पाकिस्तानी आणि बांगलादेश घुसखोरांना देशातून हाकलून लावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्यावतीने मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. हिंदू जिमखान्यातून सुरु होणारा मोर्चा आझाद मैदानात धडकणार असून राज ठाकरे यांच्या भाषणाने या मोर्चाचा समोरोप होईल. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत काही मार्ग बंद राहणार असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.  

 

MNS Rally Update: पाक-बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मनसेचा महामोर्चा

महापालिका मार्ग (दोन्ही बाजूने ) - सीएसटी, जंक्शन ते मेट्रो जंक्शनपर्यंतचा मार्ग  जंक्शन (पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर सरकारी वाहनांशिवाय इतर वाहनांना या मार्गावर प्रवेश नाही) 

 महात्मा गांधी मार्ग (दोन्ही बाजूने) ओ.सी.एस, जंक्शन ते मेट्रो जंक्शन (पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर सरकारी वाहनांशिवाय इतर वाहनांना या मार्गावर प्रवेश नाही) 

 शामलदास गांधी मार्ग - शामलदास गांधी जंक्शनवरुन प्रिन्सेस स्ट्रीट पूलावरुन चौपाटीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीस प्रवेश बंद

काळबादेवी रोड- वर्धमान जंक्शन ते मेट्रो सिनेमाकडे जाणाऱ्या वाहतूकीस प्रवेश बंद

एम. के. रोड येथील प्रिंन्सस स्ट्रीट पूलाखालील मार्ग- शामलदास गांधी जंक्शनकडे येणारी वाहतूक बंद

वळवण्यात आलेले वाहतूक मार्ग

महापालिका मार्ग (दक्षिण वाहिनी) महापालिका मार्ग उत्तवाहिनी वरुन मेट्रो जंक्शनच्या दिशेने होणारी वाहतूक ही डी.एन. रोड उत्तरवाहिनी- जे.जे. स्कूल ऑफ आर्ट- सीपी ऑफिस कॉर्नर- डावे वळण- लो.टी. मार्गावरुन पुढे मार्गस्थ होईल.

 महापालिका मार्ग  (उत्तर वाहिनी)-  सीएसएमटी जंक्शनच्या दिशेने होणारी वाहतूक ही लो.टि. मार्गाने क्रॉफर्ड मार्केट, उजवे वळण,- डी.एन. रोड- सीएसएमटी जंक्शनवरुन पुढे मार्गस्थ होईल. 

प्रिन्सेस स्ट्रीट पूलावरील मार्ग- चौपाटीच्या दिशेला जाणारी वाहने सीएसएमटी- डी.एन.रोडने- हुतात्मा चौक- उजवे वळण- वीर नरीमन रोडने पुढे चर्चेगेट जंक्शन पुढे सरळ चौपाटीच्या दिशेने

 वर्धमान जंक्शन - वर्धमान जंक्शन डोवे वळण- जुम्मा मस्जिद- उजवे वळण- लो.टि. मार्ग- क्रॉफर्ड मार्केट- पुढे मार्गस्थ

एम.के. रोड- एम. के. रोडने सरळ- आनंदीलाल पोतदार चौक डावे वळण- आंदीलाल पोतदार मार्गाने मेट्रो जंक्शनकडे

नो पार्किंग झोन!
महापालिका मार्ग, बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग, डी. एन. रोड, लो.टि. मार्ग, एम.जी. रोड, हजारीमल सोमानी मार्ग, श्यामलदास गांधी मार्ग वर्धमान जंक्शन ते एम.के. रोड जंक्शन