पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेच्या इंजिनची दिशा बदलली, आता झेंड्याचाही रंग बदलणार ?

मनसे

मनसेला सत्ता नको, प्रबळ विरोधी पक्ष बनवा अशी मागणी करत राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवली. तत्पूर्वी, लोकसभा निवडणूक न लढवता जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीस उभा होता. तिथे भाजपविरोधात प्रचार केला. 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. पण गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत मनसेला यश मिळाले नाही. गत विधानसभा निवडणुकीत एक आणि यंदाही त्यांचा एकच आमदार निवडून आला. मधल्या काळात मनसेने आपले चिन्ह 'रेल्वे इंजिन'ची दिशा बदलली होती. डावीकडे धावणारे इंजिन उजवीकडे धावू लागले. पण पक्षाला यश काही मिळाले नाही. परंतु, राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीत आता मनसे पुन्हा एकदा आपल्यात बदल करुन घेणार असल्याचे बोलले जात आहे. मनसे आपल्या झेंड्यात बदल करणार असल्याचे वृत्त माध्यमांत आले आहे. 

दंगेखोरांच्या हातात राज्य देणार का? अमित शहा

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे मनसे झेंड्याचा रंग भगवा किंवा केशरी असा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

नाराज नाही पण बदनाम करणाऱ्यांची माहिती CM ठाकरेंना दिलीः सत्तार

हिंदुत्त्वाचा मुद्दा हातात घेऊन त्याचा राजकीय फायदा घेण्याचा मनसेचा प्रयत्न असेल. हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे.

खातेवाटप झालं, वर्चस्व मात्र राष्ट्रवादीचंच