पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लतादीदी लवकर बऱ्या व्हा; राज ठाकरेंची प्रार्थना

राज ठाकरे आणि लता मंगेशकर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर गेल्या ४ दिवसांपासून मुंबईतल्या ब्रीज कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना सोमवारी पहाटे २.३० च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लतादीदींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.

'लोकसभा निवडणुकीतही हारले आणि आता सुप्रीम कोर्टातही'

राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'दीदी तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानियांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय.' दरम्यान, लतादीदी यांची प्रकृती स्थिर आणि पूर्वीपेक्षा चांगली असल्याची  माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन बच्चू कडू आक्रमक; पोलिसांनी घेतले ताब्यात

तसंच, लतादीदींची प्रकृती सुधारली की त्यांना घरी पाठवण्यात येईल. आम्ही त्यांच्या परतण्याची वाट पाहत आहोत, अशी माहिती लतादीदींच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केलेल्या सर्व चाहत्यांचे मंगेशकर कुटुंबियांनी आभार मानले आहेत. लता मंगेशकर या ९० वर्षांच्या आहेत. बॉलिवूडमधली १ हजारांहून अधिक हिंदी त्यांनी गायली आहेत. 

INDvsBAN Live: बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांतच आटोपला