पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरेंचे विद्युत नियामक आयोगाला पत्र; BESTच्या वीज दरवाढीवर आक्षेप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

बेस्टच्या वीज दरवाढीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र पाठवले आहे. यामध्ये बेस्ट विद्युत पुरवठा विभागाचा नफा परिवहन विभागाला का देते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, बेस्ट विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागाकडे वळता करु नये, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. 

विकासदर ६ ते ६.५ टक्के राहिल, आर्थिक सर्वेक्षण अहवालात अंदाज

बेस्ट गेली कित्येक वर्षे विद्युत पुरवठा विभागाला होणारा नफा हा कायमस्वरुपी तोट्यात असणाऱ्या परिवहन विभागाला वळता करत आहे. हा नफा परिवहन विभागाला वळता करु नका अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. बेस्टकडून विद्युत कायदा २००३ चे उल्लंघन होत असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले आहे. तसंच परिवहन विभागाबाबत महाविकास आघाडीचे सरकार उदासीन असल्याची टीका देखील राज ठाकरे यांनी केली आहे. 

धक्कादायक: जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण करत तरुणीचा विनयभंग

बेस्ट परिवहनचा तोटा महापालिकेने भरावा, वीज विभागाचा नफा परिवहनला देऊ नये, असे आदेश देण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे. परिवहन विभागाला कोणत्याही प्रकारे कर सवलती, अनुदान, टोल करमाफी दिली जात नाही. तसेच मुंबई महापालिकेने त्यांच्या अर्थसंकल्पात परिवहन विभागाचा अर्थ संकल्प विलीनीकरण करण्याचे आश्वासन न पाळल्यामुळे दिवसेंदिवस परिवहन विभागाचा तोटा वाढतच चालला आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहेत. 

Coronavirus : काळजी घ्या पण अति करू नका, चीनचे इतर देशांना

दरम्यान, कायद्यातील तरतुदीप्रमाणे नफा १/३ समभाग पद्धतीने विद्युत ग्राहक यंत्र सामुग्री खरेदी तसेच आस्थापना-प्रशासकीय खर्च म्हणजेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ते यासाठी देण्यात आला पाहिजे, असे राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे. तसंच, मुंबईकरांवर वीज दरवाढीचा बोजा पडणार नाही यावर आमचा ठाम विश्वास आहे. यासाठी विद्युत नियामक आयोगाने ठेवलेल्या सुनावणीवेळी विस्तृत बाजू मांडण्यासाठी योग्य कागदपत्रांसह पक्षाचे शिष्टमंडळ उपस्थित राहील, असं राज ठाकरेंनी सांगितले आहे. 

... म्हणून कुणाल कामरा यांनी इंडिगोच्या वैमानिकाला केला सलाम!