पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'देशाशी प्रामाणिक असणारे मुस्लिम आमचेच आहेत'

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले महाअधिवेशन मुंबईत पार पडले. या महाअधिवेशनावेळी राज ठाकरे यांनी पक्षाची राजकीय वाटचाल तसेच अजेंड्याबद्दल सांगितले. या महाअधिवेशनातील भाषणा दरम्यान राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा उचलला. 'मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे... मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन.', असे राज ठाकरे यांनी खडसावून सांगितले आहे. 

राज ठाकरेंनी सांगितले झेंडा बदलण्याचे कारण...

यापुढे राज ठाकरे यांनी असे सांगितले की, 'जे देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही. पण सरसकट कोणालाच माफी नाही. जर इथे येऊन धिंगाणा घातलात तर मी तुमच्या अंगावर जाईन, असे राज ठाकरेंनी सांगितले. तसंच, रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षच होता याची आठवण राज ठाकरे यांनी करुन दिली. 

घुसखोरांविरोधात मनसे मोर्चा काढणार, राज ठाकरेंचं BJP ला समर्थन?

दरम्यान, राज ठाकरे यांनी पुन्हा मशिदीवरच्या भोग्यांचा मुद्दा भाषणा दरम्यान काढला आहे. 'धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही. तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

'झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही, मनसेने झेंड्यापेक्षा मन बदलावे'