पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'९ फेब्रुवारीचा मोर्चा CAA आणि NRCच्या समर्थनार्थ नाही'

राज ठाकरे

मनसेचा ९ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणारा मोर्चा हा नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या समर्थनार्थ नाही, तर हा मोर्चा घुसखोरीविरोधात असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांच्या दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकी दरम्यान राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 

पाकिस्तानला १० दिवसांत हरवू शकतोः PM मोदी

बेकायदा बांगलादेशींना भारतातून हाकला हीच आमची भूमिका असल्याचे राज ठारे यांनी सांगितले. तसंच, घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱ्या मोर्चांच्या विरोधात मनसेचा मोर्चा असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. सीएए आणि एनआरसीला माझे समर्थन नाही. याबाबत फक्त चर्चा होऊ शकते, असे देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. 

सत्ता येताच सरकारी जमिनीवरील मशिदी हटवूः भाजप खासदार

दरम्यान, सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देण्यावरुन पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सोमवारी रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये ९ फेब्रुवारी रोजी सीएए समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चाविषयी चर्चा झाली. मात्र मनसेची नेमकी भूमका काय? मनसे सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देणार का? मनसे भाजपसोबत जाणार का असे अनेक प्रश्न मनसे पदाधिकाऱ्यांच्या मनात होते. या प्रश्नांचे राज ठाकरे यांनी निराकरण केले. 

नवी संकल्पना, गाड्या अनेक मात्र मोटार पॉलिसी एक!