पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरेंनी सांगितले झेंडा बदलण्याचे कारण...

राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या महाअधिवेशनात पक्षाचा झेंडा का बदलला याचे कारण सांगितले. २००६ साली मनसे पक्ष स्थापन झाला. त्यावेळी माझ्या मनातला जो झेंडा होता तो हाच झेंडा आहे. पूर्वीपासून भगवा झेंडा माझ्या मनात होता, असे  राज ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, कात टाकावी लागते. नवीन उर्जा द्यावी लागले. सकारात्मक गोष्टीसाठी चांगला बदल आवश्यक असतो, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

 

राज म्हणाले जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो अन्...

मनसे पक्ष स्थापनेवेळी हा राजमुद्रा असलेला भगवा झेंडा माझ्या मनात होता. मात्र पक्ष स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले. म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 

'झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही, मनसेने झेंड्यापेक्षा मन बदलावे'

माझ्या डोक्यातून हा झेंडा जात नव्हता. ६ वर्षापूर्वी शिवजंयतीला हा झेंडा बाहेर काढण्याचा विचार केला. आपण बदलले पाहिजे हे गेल्या काही दिवसांपासून मनात सुरु होते. आमचा डीएनए हाच झेंडा आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. ही महाराजांची राजमुद्रा आहे. राजमुद्रा आपली प्रेरणा आहे. हा इतर कुठला झेंडा नाही. तो ज्यावेळी हातात घ्याल तेव्हा कुठेही वेडा वाकडा पडलेला दिसता कामा नये, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले. 

सरकारच्या जाहिरातींमध्ये PM मोदींचे छायाचित्र ठेवा

यापुढे राज ठाकरे यांनी असे सांगितले की, आपले दोन झेंडे आहेत. एक राजमुद्रा असलेला आणि तसाच दुसरा निशाणीचा झेंडा आहे. निवडणुकीच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. राजमुद्रेचा मान राखला गेलाच पाहिजे. कुठेही गोंधळ होता कामा नये, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. दरम्यान, पक्षाचा झेंडे बदलणे हे मनसे पहिल्यांदा करते असे नाही. आधी अनेक पक्षांनी आपले झेंडे बदलले आहे. 

मनसे झेंडा वाद: संभाजी ब्रिगेडकडून राज ठाकरेंविरोधात तक्रार