पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करणाऱ्यांना गोळ्या घाला: राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनला गांभीर्याने घ्या. लॉकडाऊनचे दिवस वाढवले तर त्याचा मोठा परिणाम होईल. अशात कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. दिल्लीतील मरकजमध्ये जो प्रकार घडला अशा लोकांवर तुम्ही उपचार कसले करता? त्यांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल किंवा काही कारस्थान वाटत असेल तर त्यांना जगवायचे कशाला? असा सवाल करत त्यांना फोडून काढले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राज ठाकरेंनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले, डॉक्टर स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. पोलीस, शेतकरी, पाणीपुरवठा कर्मचारी आणि सरकार काम करत आहे. मात्र लोकांना याचे गांभीर्य कळत नाहीय. तसंच, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, कर मिळणार नाही, उद्योगधंदे बंद राहतील, मंदी येईल. आपल्या एका चूकीमुळे मोठा परिणाम होईल, असे राज ठाकरेंनी सांगितले. 

श्वासातून आणि बोलण्यातूनही कोरोनाचा संसर्ग शक्य - संशोधन

सध्या लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. नोकरी राहिल की नाही याची चिंता लोकांना पडली आहे. शिस्त पाळत नाही त्यांच्यामुळे या सर्व गोष्टी घडत आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगितले. सध्या जी शांतता आहे इतकी शांतता मी कधीच पाहिली नव्हती. १९९२-९३ च्या दंगलीतही ऐवढी शांतता पाहिली नव्हती, असे ते म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात काळाबाजार करणाऱ्यांना फोडून काढा, असे राज ठाकरेंनी सांगितले. 

परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणे शक्य नाही: केंद्र सरकार

लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर हात टाकण्याची हिंमत कशी होते? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. पोलिसांना आणि डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन काय फायदा होणार नाही त्यांना फोडून काढले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करुन चालणार नाही. समाजाची सर्वात मोठी जबाबदारी आहे, नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञही असायला हवं. सरकार चांगले काम करत आहे, असे ते म्हणाले. 

कोरोनाशी लढा, कोर्टाचे कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून

तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे दिवे घालवून मेनबत्त्या पेटवतील. घरी बसून काहीतरी करायचं म्हणून ते करतील. पण मेणबत्त्या पेटवून परिणाम होणार असतील तर पेटवावे. पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता, असे सांगत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.  दरम्यान, मरकज कार्यक्रमाला परवानगी कशी मिळते असा सवाल त्यांनी केला आहे. वसईत मरकजला परवानगी नाकारल्याबद्दल राज ठाकरेंनी पोलिसांचे अभिनंदन केले. तसंच लॉकडाऊनच्या काळात दिवसरात्र मेहनत करणाऱ्या पोलिस, पत्रकार, डॉक्टर याचे त्यांनी आभार मानले.  

संचारबंदीचे उल्लंघन: भाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल