पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बेडूक उड्या मारुन दुसऱ्या पक्षाची लाचारी करणाऱ्यांनी मनसेला शिकवू नये'

अमेय खोपकर

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'मनसेच्या जीवावर मोठे होऊन ज्यांनी मनसेला ‘रामराम’ ठोकला आणि बेडूकउड्या मारुन दुसऱ्या पक्षाची लाचारी सुरु केली. त्यांनी मनसेला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे. तसंच, पा’दरे’ पावटेंच्या इशाऱ्यांना आपण अजिबातच भीक घालत नाही आणि त्यांच्या सल्ल्याची राजसाहेब आणि आम्हांला काडीचीही गरज नाही, असे अमेय खोपकर यांनी सांगितले.

CAA मुळे मुस्लिमांना कोणताही धोका नाही - रजनीकांत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या महाअधिवेशनात हिंदुत्ववादाची घोषणा केली. तेव्हापासून मनसे आणि भाजपमध्ये युती होईल अशी चर्चा सुरु होती. अशातच, मनसेने आपली विचारधारा सोडली तर भाजपसोबत घेण्याचा विचार करु, असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा अमेय खोपकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 'विचारधारा वैगरे शब्द दरेकरांच्या तोंडी शोभत नाहीत. सत्तेची ऊब ज्यांना सतत हवीहवीशी वाटते आणि त्यासाठी कसल्याही तडजोडी करण्याची तयारी असते त्या दरेकरांनी विचारधारेवर बोलणं हा आजचा सर्वात मोठा विनोद आहे', अशी टीका अमेय खोपकर यांनी केली आहे.

कळव्याजवळ धावत्या लोकलमधून तिघे पडले, एकाचा मृत्यू

तर, येत्या ९ फेब्रुवारी रोजी मनसे बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहे. या मोर्चासंदर्भात मनसेने जोरदार पोस्टरबाजी केली आहे. यावरुन भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली होती. 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणात नेहमीच बांगलादेशींना हाकलून द्या असे सांगायचे. सध्या शिवसेना सत्तेत असल्याने ते विरोध करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता मनसेच्या रुपाने पुढे आली.', असल्याचे वक्तव्य राम कदम यांनी केले होते.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा राजीनामा

राम कदम यांच्या या वक्तव्याचा देखील अमेय खोपकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 'राम कदम यांना जुने दिवस आता आठवत नसतील कदाचित, पण जेव्हा ते मनसेमध्ये होते, तेव्हासुद्धा बाळासाहेबांवर आमची नितांत श्रद्धा होती आणि आजही आहे. मनसे आता शिवसेनेच्या मार्गावर आहे वैगरे बोलून आपली अक्कल पाजळू नका. कोण सत्तेच्या मागावर आहे हे आम्ही पुरेपूर ओळखून आहोत.', अशी टीका अमेय खोपकर यांनी केली आहे. 

धक्कादायक! औरंगाबादमध्ये महिलेला घरात घुसून जाळले