सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या व्हिडिओवरुन शिवप्रेम चांगलेच संतापले आहेत. या व्हिडिओवरुन मनसेने देखील नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला कमीपणा वाटते का? असा सवाल मनसेने केला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटरवर नवाब मलिकांचा तो व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 22, 2020
अक्षय्य तृतीयेला सुरु होऊ शकते राम मंदिराचे बांधकाम
रायगड किल्ल्यावरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, विद्या चव्हाण उभे राहिले आहेत. या व्हिडिओमध्ये धनजंय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत आहेत. अजित पवार यांच्यासह सर्व जण शिवरायांच्या नावाने जय असे म्हणत आहेत. मात्र नवाब मलिक फक्त हातावर हात ठेवून उभे राहिलेले दिसत आहेत. या व्हिडिओवर शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.
लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडितेचा मृत्यू
दरम्यान, मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, 'आमचे असंख्य मुस्लिम बांधव आहेत. ज्यांच्यासमोर कुणी 'छत्रपती शिवाजी महाराज की' असं ओरडलं की ते आनंदाने 'जय...' अशी गर्जना करतात. मग या नवाब मलिकांना इतकी मग्रुरी का? आमच्या महाराजांचा जय जयकार करण्यात त्यांना कमीपणा वाटतो काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, अशा प्रवृत्तीच्या माणसाने राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष पदावर रहावे, हे तुम्हाला पटते का? या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ज्यांना त्यांचे समर्थन डायरेक्ट 'जाणता राजा' संबोधतात. त्या शरद पवारांना तरी असा माणूस करा काय पक्षात चालतो?, असा सवाल त्यांनी केला आहे.