पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Coronavirus: मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द

राज ठाकर (Satyabrata Tripathy/ht)

देशासह राज्यात कोरोना विषाणूचा वाढलेला पार्दुभाव लक्षात घेता मनसेचे आपला गुढीपाडवा मेळावा रद्द केला आहे. मनसेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे मेळावा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यात येत्या काही दिवसांत होणाऱ्या महापालिका निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात अशी मागणीही मनसेने केली आहे. मनसेसाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा होता. मनसेच्या पुढील वाटचालीची दिशाही यात निश्चित होणार होती. राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात याविषयी बोलणार असल्याचेही सांगितले होते. परंतु, कोरोना विषाणूमुळे हा मेळावाच रद्द करावा लागला आहे. 

पाकची भारताला साथ, व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होणार सहभागी

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यासाठी राज्यभरात बैठकांचे आयोजन केले जाणार होते. त्यामुळे विविध ठिकाणाहून पदाधिकारी त्या बैठकीला येणार होते. तसेच मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते या मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर येणार होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी करणे सध्या योग्य नाही. तसेच राज्य सरकारनेही सर्व कार्यक्रम रद्द केले असून गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मनसेने हा मोठा निर्णय घेतला आहे. 

अलिबागमधील मांडव्याजवळ बोट बुडाली, ८८ प्रवाशी सुखरुप

यावेळी राज्य सरकारकडून कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी होत असलेल्या तयारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.