पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य ठाकरेंच्या 'पर्यटन' विभागावर अमित ठाकरेंची नजर

अमित ठाकरे- राज ठाकरे

सध्याच्या सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या शॅडो केबिनेट म्हणजेच प्रतिरुप मंत्रीमंडळाची स्थापना केली आहे.  विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पर्यटन, मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान, नगरविकास अशी खाती देण्यात आली आहेत.  यातील लक्ष वेधण्यासारखी बाब म्हणजे सध्याच्या सरकारमध्ये पर्यटन खाते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे. 

मनसेचं 'शॅडो कॅबिनेट' जाहीर, पाहा यादी

नवी मुंबईत मनसेचा १४ वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष अनिल शिदोरे यांनी मनसेचं शॅडो कॅबिनेट जाहीर केलं. यावेळी अमित ठाकरे यांच्याकडे पर्यटन खात्यासह अनेक खात्यांची जबाबदारी देण्यात आली. अमित ठाकरे यांच्याकडे आलेल्या या जबाबदारीमुळे आदित्य ठाकरेंच्या कामावर अमित ठाकरेंची नजर असणार हे नक्की.

मंत्रालयात पाच दिवसांचा आठवडा आणि कारागृहातील कर्मचाऱ्यांना ७ दिवस काम

''सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी हे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. सरकारचे वाभाडे काढण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट आहे.'' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मनसेच्या अनेक बडे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडे विविध खाती सोपवण्यात आली आहेत.