पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वारकऱ्यांचाही भगवा आहे आणि छत्रपतींचाही भगवाच होता!- शर्मिला ठाकरे

शर्मिला ठाकरे

मुंबईतील महामोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून आहे. आजचा दिवस मनसेमय झाल्याचे चित्र आहे. या मोर्चासाठी राज ठाकरे कृष्णकुंज या निवासस्थानावरुन बाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसेने झेंडा बदलून भूमिका बदलल्याची चर्चा सध्या राज्यात सुरु आहेत. यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. झेंडा बदलल्यानंतर मनसेची भूमिका बदलली आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. 

मनसे मोर्चाला भाजपची साथ! संदीप देशपांडेंनी दिलं सेनला उत्तर

यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, आम्ही हिंदूत्व कधीच सोडलेलं नाही. त्यानंतर त्यांना शिवसेना आणि मनसे यांच्यातील हिंदूत्वामध्ये काय फरक  आहे? असा खोचक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्यांनी कसलेल्या राजकारण्यासारखे उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. वारकऱ्यांचा भगवा आहे आणि छत्रपतींचाही भगवा होता, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिले. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या स्थापनेपासून ध्वजामध्ये भगवा आहे, असेही त्यांनी सांगितले. 

महामोर्चासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो मनसे सैनिक मुंबईत!

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते महामोर्चासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. यात महिलांचा देखील समावेश आहे. पक्षाच्या स्थापनेपासून महिला कार्यकर्त्यांचा राज साहेबांना पाठिंबा असल्याचे शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या. महिला शक्ती ही मनसेची ताकद असल्याचे यामोर्चातूनही दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mns chief raj thackeray wife sharmila thackeray reaction on maharashtra navnirman sena Maha Morcha