पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तर यापुढं तलवारीला तलवारीनं उत्तर देऊ, राज ठाकरेंचा इशारा

राज ठाकरे (PC-Satyabrata Tripathy/ht)

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, आज तुम्ही जी ताकद दाखवली आहे. त्यासाठी मी तुमचे शतशः आभारी आहे. आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले आहे. यापुढे नाटक कराल तर दगडाला दगडाने तर तलवारीला तलवारीने उत्तर देऊ, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सीएए-एनआरसी विरोधकांना इशारा दिला. मनसेच्या वतीने मुंबईत आयोजित महामोर्चाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राज्यभरातून मोठ्याप्रमाणात मनसैनिक मुंबईत दाखल झाले होते. 

काय म्हटलं राज ठाकरेंनी..

मुसलमानांनी जे मोर्चे काढले त्याचा मला अर्थच कळला नाही. जे जन्मापासून इथं राहतात. त्यांना कोणी बाहेर काढले. बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना हाकललंच पाहिजे. हा मोर्चा काय म्हणून आणि कोणाला ताकद दाखवण्यासाठी काढला?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

१९५५ साली नागरिकत्व कायदा अस्तित्वात आला. काळानुसार त्या कायद्यात बदल नको का? कायद्याबद्दल माहिती नसणारेही यावर बोलतात, हे हास्यास्पद आहे. 

आपण केवळ दंगल झाल्यानंतरच हिंदू असतोः राज ठाकरे

केंद्राविरोधात काही बोललं तर लगेच भाजपविरोधी म्हटलं जातं. त्यांच्या कामाची स्तुती केली तर भाजपचा समर्थक म्हटलं जातं. या दोघांच्या मध्ये कोणी नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राम मंदिर, कलम ३७० चं समर्थन केल्याचे त्यांनी सांगितले. 

पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा बनला आहे. अमेरिकेतील टि्वन टॉवर पाडणारा लादेनही पाकिस्तानमध्ये सापडला. मुंबईत बॉम्बस्फोट करणारा दाऊद इब्राहिमला पाकिस्तानने सांभाळला आहे. ज्यावेळी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यकांवर अत्याचार होतात. ते अल्पसंख्यक म्हणजे हिंदू. त्यामुळे त्यांना नागरिकत्व देण्यास विरोध का. काहीजण तिकडच्या मुसलमानांना नागरिकत्व देण्याची मागणी करत आहेत. हे कसे शक्य आहे. सीएएमध्ये काहीही गैर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

'मनसे' महामोर्चातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर!

माझा देश म्हणजे काही धर्मशाळा आहे का?, असा सवाल करत प्रत्येकवेळी माणसुकीचा ठेका भारताने घेतलेला नाही. जिकडे मराठी मुसलमान राहतात तिथे अजिबात दंगली झालेल्या नाहीत पण अनेक ठिकाणी मोहल्ले उभारले गेले आहेत. तिथे बांगलादेशी-पाकिस्तानी मुसलमान राहतात. तिथे जाताही येत नाही.

नायजेरियन लोकांबाबतही त्यांनी भाष्य केले. नायजेरियन ड्रग्ज विकतात. महिलांचा छेड काढतात. आपण फक्त षंढांसारखं बघत बसायचं. 

वारकऱ्यांचाही भगवा आहे आणि छत्रपतींचाही भगवाच होता!- शर्मिला ठाकरे

देशातील आर्थिक स्थितीवरुन लक्ष हटवण्यासाठी जर हे कायदे आणताय का, हे स्पष्ट करा असा जाब त्यांनी केंद्र सरकारला विचारला.