पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

किल्ल्यांऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्याः राज ठाकरे

राज ठाकरे

महाराष्ट्र सरकारच्या गडकिल्ले भाड्याने देण्याच्या धोरणावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आता महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. गडकिल्ल्यांना हात लावाल तर परिणाम दिसतील, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. सरकारला उत्पन्न मिळवायचे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत. मंत्र्यांचे बंगले मोठे एैसपेस आणि तिथे लॉनही असते. त्यातून चांगले पैसेही मिळतील, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणाही साधला.

'कितीही चौकशा होऊ द्या, पण मी तोंड बंद ठेवणार नाही'

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे डोंबिवली येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यातल्या गड, किल्ल्यांना हात लावायची हिंमतही करु नका. महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत सरकारला उत्पन्नच हवे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे. 

'राज ठाकरे चौकशीसाठी निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला'

महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास आहे, मात्र सरकारला याचे काहीच देणेघेणे नाही. भाजप मशीनमध्ये हेराफेरी करून निवडून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावनेबाबत त्यांना काही वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

प्रवीण सारखं टोकाचं पाऊल उचलू नका, राज यांची कळकळीची विनंती