पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधात लढा : राज यांनी केलं ठाकरे सरकारचं कौतुक

राज ठाकरे

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. याचदरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारच्या कार्याचे कौतुक केले आहे. थोडासा उशीर झाला पण राज्य सरकारने योग्य पाऊल उचलले आहे. सरकारी कर्मचारी, डॉक्टर आणि पोलिसांचे विशेष कौतुक करत प्रतिकूल परिस्थितीतही अत्यंत धैर्याने ही लोकं जनतेची सेवा करत असल्याचे त्यांनी म्हटले. 

कोरोना : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद

'एबीपी माझा'शी बोलताना ते पुढे म्हणाले की, मी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. राज्यात आंतरराष्ट्रीय विमाने उतरवण्यास बंदी घालण्यात आली आहे. सरकारने आता देशांतर्गत विमानेही बंद करायला हवीत, अशी सूचना मी त्यांना केली. मुख्यमंत्र्यांनी यावर विचार सुरु असल्याचे सांगितले. 
काही मूठभर लोकांना अजूनही या विषाणूचे गांभीर्य कळत नाहीये. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही वाहने रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. लोक कशामुळे घराबाहेर पडले आहेत. जनता कर्फ्यू एक टेस्ट केस होती. लोकांनी नाही ऐकले तर सरकारला कठोर पावले उचलावी लागतील. 

हा आजार पसरला तर ते आवरण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशातील, महाराष्ट्रातील लोकांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की, त्यांनी या आजाराला सहजपणे घेऊ नये. हा आकडा किती पसरला आहे, याची सरकरालाही कल्पना नाही. जर लोक घरी बसले तर सरकारलाही ही माहिती गोळा करणे सोपे जाईल. जे काही सुरु आहे, ते सर्व आपल्यासाठी आहे. 

लॉकडाऊन असलेल्या शहरांमध्ये ओला-उबरची सेवा तात्पुरती बंद

लवकरात लवकर हे जगावरचे संकट टळो, ही प्रार्थना मी करतो.  ज्या गोष्टी स्वतःहून पाळायला हवीत ती पाळा, असे आवाहनही त्यांनी केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mns chief raj thackeray praises thackeray goverment for action taken against coronavirus COVID 19