पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज ठाकरे आणि शरद पवार भेट

विधानसभा निवडणूक निकाल लागून १० दिवस झाले तरी सुध्दा राज्यात सत्ता स्थापनेवरुन वाद सुरु आहे. अशामध्ये अनेक राजकीय पक्षनेते एकमेकांची भेट घेताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानी ही भेट झाली. तब्बल १५ मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी सुध्दा या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

आमचं ठरलंय, आम्ही विरोधी पक्षातच बसणार: अजित पवार

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच म्हणजे ३० ऑक्टोबर रोजी मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. शरद पवार यांच्या कार्यपध्दीवर प्रभावित होऊन आपण भेट घेतली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. तसंच पुढच्या काही दिवसात राज ठाकरे हे देखील पवारांची भेट घेतील असे संदिप देशपांडे यांनी यावेळी सांगितले होते. त्यानुसार शरद पवार आणि राज ठाकरे यांची ही भेट झाली. 

सरकारविरोधात काँग्रेस करणार आंदोलन; विरोधी पक्षांची बोलावली बैठक