पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सावध ऐका पुढल्या हाका, राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

राज ठाकरे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हवामान बदलावरुन नागरिकांना सावधानतेचे आवाहन केले आहे. सर्वांनी आताच सावध होऊन पुढच्या हाका ऐकायला हव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ, तापमान वाढ या बातम्या अनेक वर्षे आपण नित्यनेमाने वाचतोय. पण त्यामागचं दाहक वास्तव आपल्या लक्षात येत नाही. आजपर्यंत मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष होते. पण आता कोकणात देखील हीच परिस्थिती आहे. आपण सर्वांनी सावध होऊन पुढच्या हाका ऐकायला हव्यात, असे ट्विट त्यांनी केले आहे. 

राज ठाकरे यांनी एकापाठोपाठ एक असे सलग ट्विट करत पर्यावरणाबाबत जागरुक राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, हवामान बदल आणि त्याचे दुष्परिणाम हे #WorldEnvironmentDay च्या दिवशी समजून घेतले तरंच खऱ्या अर्थाने हा दिवस साजरा केला, असे म्हणता येईल. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सरकार काही करेल, याची वाट न पाहता जनमताचा रेटा कसा उभा राहत आहे हे समजून घ्यावे लागेल, असे म्हणत त्यांनी पर्यावरण चळवळ उभ्या केलेल्या आणि जागतिक हवामान बदल चळवळीचा चेहरा बनलेल्या १६ वर्षीय ग्रेटा थनबर्ग नावाच्या मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रीक बसच्या वापरावर भरः मुख्यमंत्री