पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेला एका जागेवर यश, कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील विजयी

राजू पाटील (फेसबुक वॉलवरून साभार)

विधानसभा निवडणुकीत १०० जागांवर उमेदवार उभे केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एका जागेवर यश मिळाले आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून प्रमोद (राजू) पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा पराभव केला. प्रमोद पाटील यांच्या रुपाने नव्या विधानसभेत मनसेचा आवाज उठविणारा आमदार पक्षाला मिळाला आहे.

सत्ता स्थापनेची घाई नाही, सर्व पर्याय खुले, उद्धव यांचे दबावतंत्र

विधानसभा निवडणूक लढविणार की नाही, याबद्दल सुरुवातीला मनसेमध्ये स्पष्टता नव्हती. पण नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जागा न लढविता काही जागांवर उमेदवार उभे कऱण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुमारे १०० जागांवर मनसेचे उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी जाहीर सभाही घेतल्या होत्या. नेहमीप्रमाणे त्यांच्या सभांना उदंड प्रतिसाद मिळाला होता. विधानसभेत सध्या सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आमची निवड करावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.

मोदींनी एकाच दिवशी दोन उमेदवारांसाठी सभा घेतल्या आणि दोन्ही पडले!

गेल्या विधानसभा निवडणुकीतही २०१४ मध्ये मनसेचा केवळ एक उमेदवार निवडून आला होता. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शरद सोनावणे विजयी झाले होते. पण काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी २००९ मधील निवडणुकीत मनसेला विधानसभेत चांगले यश मिळाले होते. मनसेचे १३ उमेदवार निवडून गेले होते.