पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेच्या ९ फेब्रुवारीच्या मोर्चाचा मार्ग ठरला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा ९ फेब्रुवारी रोजी निघणाऱ्या मोर्चाचा मार्ग अखेर ठरला आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यान येथून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले आहे. मनसे पत्रव्यवहार करुन मुंबई पोलिसांकडे या मार्गावरून मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागणार आहे. 

मनसेच्या ९ फेब्रुवारीच्या मोर्चाचा मार्ग ठरला

दरम्यान ९ फेब्रुवारीला काढण्यात येणारा मोर्चा नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या समर्थनार्थ नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. तसंच हा मोर्चा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकी दरम्यान राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 

प्रशांत किशोर आणि पवन वर्मांची जदयूमधून हकालपट्टी