पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेचं शॅडो कॅबिनेट सरकारचे वाभाडे काढण्यासाठी: राज ठाकरे

राज ठाकरे

महाराष्ट्रातील विविध समाजगटासाठी एक वेगळा प्रयोग म्हणून मनसेने प्रतिरुप मंत्रिमंडळाची (शॅडो कॅबिनेट) स्थापना करण्यात आली आहे. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी हे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. सरकारचे वाभाडे काढण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट आहे. पण प्रत्येकवेळी वाभाडेच काढले पाहिजेत असे नाही. तर त्यांनी चांगले काम केले तर त्यांचे कौतुकही करायचे, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. 

मनसेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. 

काय म्हटलं राज ठाकरे यांनी...

१४ वर्ष झाली, प्रवास सुरु आहे. यात माध्यमांनी प्रेम दिलं, बोचरी टीका केली पण हे चालायचंच. इतक्या चढ उतारानंतर देखील तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक माझ्यासोबत राहिलात याचा मला आनंद झाला आहे. काँग्रेसची केंद्रात सत्ता होती. आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. हे प्रकार होत असतात. जेव्हा देशात लाट असते तेव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला?

गेल्या १४ वर्षांत आपण अनेक कामं केली. तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही. लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत. पण मतदान आम्हाला नाही करणार याला काय अर्थ आहे?

प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात, पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला या कामात सहभागी करून घेईन