पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड

शिळफाटा येथे वृक्षलागवड

मुंबईमध्ये मेट्रो -३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीमध्ये २ हजार ७०० झाडं तोडण्यात आली. या वृक्षतोडीला पर्यावरणी प्रेमी, स्थानिक नागरिकांसह राजकीय पक्षांनी देखील विरोधत केला. याविरोधानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जंगल उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. एमएमआरडीएने मुंबईजवळच्या शिळफाटा येथे वन विभागाच्या मालकिच्या जागेवर झाडे लावली आहेत. 

'हिरकरणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा

शिळफाटा, ठाणे आणि गोठेघर परिसरातील ४६ हेक्टर जमिनीवर तब्बल ५१ हजार १५१ वृक्षांची लागवड केली आहे. यासाठी जवळपास ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. एका झाडासाठी १ हजार २२८ रुपये खर्च करण्यात आला आहे.  पुढील ३ वर्षापर्यंत प्रत्येक झाडांच्या देखभालीसाठी खर्च करण्यात आला आहे.

विक्रोळी-जोगेश्वरी लिंकरोडवर डंपरला अपघात; मोठी वाहतूक

एमएमआरडीएने शिळफाटा परिसरात कडुलिंब, अर्जुन, कांचन, बळुक, बेहडा, जांभूळ, वड, पिंपळ, कदंब, वावळा यासारखी झाडे लावली आहे. भविष्यामध्ये आणखी वृक्षलागवड आणि त्याचे संवर्धन करण्याच्या उपक्रमावर भर देण्यात येणार असल्याचे एमएमआरडीने सांगितले आहे. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद