पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मिठी नदीचा पूर थांबवण्यासाठी कृत्रिम तलाव बांधणार?

मुंबई पाऊस

मुसळधार पावसाने बुधवारी मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईची लाईफलाईन पूर्णत: कोलमडली होती. तसंच ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अनेक मुंबईकर ठिकठिकाणी अडकले होते. या पावसामुळे मिठी नदीला पूर आला होता. या पूराचे पाणी आसपासच्या परिसरात शिरल्यामुळे त्याठिकाणच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. यावर उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाकडून कृत्रिम तलाव किंवा तळी बांधण्याची योजना आखण्यात येत आहे.

काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना पुन्हा तिकीट देण्याच्या तयारीत

मुंबईतल्या विहार, तुळशी आणि पवई या तीन तलावांमधून मिठी नदीमध्ये पाणी सोडले जाते. मिठी नदी माहीम खाडीजवळ अरबी समुद्राला मिळते. मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यास या तलावांमधून जास्तीचे पाणी मिठी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीला पूर येऊन पूराचे पाणी नदीकाठच्या परिसरामध्ये शिरते आणि त्याठिकाणचे जनजीवन विस्कळीत होते. समुद्राला भरती आल्यानंतर मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत जाते. त्यामुळे दरवर्षी याठिकाणच्या नागरिकांचे हाल होते. 

UAPA तील सुधारणांविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात

'तलावातून सोडण्यात येणारे पाणी मिठी नदीमध्ये सोडण्याऐवजी ते जर पर्यायी जलाशयाकडे वळवले तर मिठी नदीचे पाणी कमी करण्यास मदत होऊ शकते', असे स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 'आम्ही बाधित प्रभागांपैकी एक आहोत. यावर कायमस्वरुपी उपाय काढण्याची खूप गरज आहे', असी चिंता बीएमसीच्या 'एल' प्रभागाचे सहाय्यक आयुक्तांनी व्यक्त केली.  

चांद्रयान २ साठी महत्त्वाचा क्षण, विक्रम लँडर शनिवारी चंद्रावर

'आम्ही यासाठी एक सल्लागार नेमणार आहोत. जो शहरात किंवा इतर ठिकाणी जमीन उपलब्ध असेल तेथे कृत्रिम तलाव बांधण्यासाठी योजना आखेल. कमी पाऊस किंवा पाऊस पडत नसेल तेव्हा या कृत्रिम तलावातील अतिरिक्त पाणी मिठी नदीमध्ये सोडण्यात येईल. तसंच या कृत्रिम तलावातील पाण्याचा दुसऱ्या पर्यायासाठी वापरता येईल का याचा विचार हे सल्लागार करतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिली. 

तिहारमध्ये चिदंबरम यांना कोणत्याही विशेष सुविधा नाही, फक्त...

मुंबईमध्ये बुधवारी  पावसाने हाहाकार माजवला. मिठी नदीला पूर आल्यामुळे हे पाणी  कुर्ला, माटुंगा, सायन, माहिम परिसरामध्ये साचले. या पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील सेवा ठप्प झाली होती. उपनगरीय भागातील सर्व रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक देखील ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले. मिठी नदीचे पाणी कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांतीनगरमध्ये शिरले. याठिकाणी राहणाऱ्या १ हजार ७०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. यावर्षी पावसाळ्यात तिसऱ्यांदा या लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते. 

रानू मंडलचं गाणं ऐकून लता मंगेशकर म्हणतात....