पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चेंबूर: वडिलांनी आत्महत्या केली तिथेच मुलीचाही मृत्यू, नवी माहिती उघड

प्रातिनिधिक छायाचित्र

चेंबूरमधील १७ वर्षीय बेपत्ता मुलीच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.  १७ वर्षीय आरती  रिठाडिया हिचा मृत्यू ती बेपत्ता झाली त्याच दिवशी झाला असल्याचं मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात उघड झालं आहे.  २०१९ मध्ये आरती  रिठाडिया हे प्रकरण चांगलचं गाजलं होतं. 

काय आहे आरती  रिठाडिया बेपत्ता प्रकरण?
२५ एप्रिल २०१९मध्ये पंचाराम रिठाडिया या व्यक्तीनं आपली १७ वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. मात्र काही महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षांच्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची मदत होत नाही असं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करत पंचाराम यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये टिळकनगर रेल्वे स्टेशनजवळ धावत्या ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली  होती. 

कोरोना विषाणू : ... म्हणून गूगलने आपल्या सर्च रिझल्टमध्ये केला बदल

अंत्ययात्रेत हिंसाचार
रिठाडिया याच्या अंत्ययात्रेवेळी जमाव संतप्त झाला होता. अंत्ययात्रेदरम्यान संतप्त जमावाने चेंबूर येथील सायन-पनवेल महामार्गावर रास्तारोको करुन दगडफेक करत संताप व्यक्त केला होता. यावेळी संतप्त जमावानं पोलिस वाहनांसह अन्य वाहनांची आणि दुकानांची तोडफोड केली होती. याप्रकरणात पोलिसांनी २०० जणांवर गुन्हा दाखल केला होता तर असून ३३ जणांना अटक केली होती.
 
चेंबूर बेपत्ता मुलीच्या शोधाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरतीनं ३० मार्चला घर सोडलं त्याचदिवशी चेंबूर - टिळकनगर स्थानकादरम्यान रेल्वे अपघात तिचा मृत्यू झाला होता. रेल्वे पोलिसांना रेल्वे रुळावर आरतीचा मृतदेह देखील सापडला होता. मात्र या मृतदेहाची ओळख तेव्हा पटली नव्हती किंवा कोणत्याही नातेवाईकांनी या मृतदेहाचा ताबा घेतला नव्हता. तिचा मृतदेह गेले कित्येक महिने शवगृहात होता.

विरोधाच्या नावाखालील हिंसाचार देशालाच कमकुवत करतो: राष्ट्रपती
 
दरम्यान, बेपत्ता आरतीचा शोध गुन्हे शाखेकडून सुरुच होता. आरती बेपत्ता झाल्यापासून शहरातल्या ९४ पोलिस ठाण्यात छोट्या छोट्या माहितीचाही शोध घेतला जात होता. एका पथकानं ३० मार्चला अपघाती मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या यादीचा शोध घेतला. ३० जानेवारीला गुन्हे शाखेच्या टीमला शीवमधील शवागृहात ताबा न घेण्यात आलेला मुलीचा मृतदेह आढळला. या मृतदेहाशी आरतीचे वर्णन हुबेहुब  जुळत होते. आरतीच्या आईकडून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे.