पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक! मालाडमध्ये ७ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

पुण्यात चिमुरडीवर बलात्कार

मुंबईतल्या मालाडमध्ये ७ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या शौचालयात या चिमुकलीवर एका  तरुणाने बलात्कार केला. याप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

दिल्लीमध्ये आज काँग्रेसची 'भारत बचाओ रॅली'; मोदी सरकारला घेरणार

मालवणी येथील एका शाळेमध्ये चिमुकली इयत्ता पहिलेमध्ये शिकते. १२ डिसेंबरला चिमुकली नेहमी प्रमाणे दुपारी शाळेत गेली. शाळेमध्ये असलेल्या शौचालयात नेऊन तिच्यावर एका तरुणाने बलात्कार केला. चिमुकली शाळेतून घरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला असता त्यांना धक्का बसला. चिमुकलीच्या पालकांनी मालवणी पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. 

दिल्लीत लाकडाच्या वखारीला भीषण आग

पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी मालवणी पोलिस ठाण्यावर आंदोलन केले. आरोपीला कडक शिक्षा द्यावी तसंच शाळा प्रशासनावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

खडसेंनी जाहीर बोलणं टाळायला हवं होतं- फडणवीस