पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मिलिंद एकबोटेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मिलिंद एकबोटे आणि राज ठाकरे

कोरेगाव-भीमा प्रकरणातील संशयित आरोपी संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे १५ ते २० मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. 

कोरोनामुळे इटलीत एकाच दिवशी १३३ जणांचा मृत्यू, २ कोटी मास्कची ऑर्डर

येत्या २४ तारखेला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रूकच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आपण येथे आलो होतो. राज ठाकरे यांनी येथे येऊन त्यांचे विचार उपस्थितांसमोर मांडावेत, म्हणून त्यांना विनंती केल्याचे एकबोटे यांनी माध्यमांना सांगितले. 

राज ठाकरे यांनी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे, असे एकबोटे म्हणाले. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणानंतर मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्यावर पुण्यात अॅट्रॉसिटी व दंगल भडकावणे या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. 

रक्तात गद्दारी असणारे फडणवीसांशी प्रामाणिक राहतील? : जितेंद्र आव्हाड

दरम्यान, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली. राज यांनी प्रबोधनकारांची शिकवण लक्षात ठेवावी, असा सल्ला त्यांनी राज ठाकरेंना दिला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:milind ekbote met raj thackeray in mumbai for chhatrapati sambhaji maharaj death anniversary programme