पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरे कॉलनीत मध्यरात्री राडा, झाडे तोडण्यावरून आंदोलक संतप्त

आरे कॉलनीत आंदोलक संतप्त (फोटो सत्यव्रत त्रिपाठी)

मेट्रो ३ च्या कारशेडसाठी मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्याला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी हिरवा कंदील दिल्यानंतर त्याच दिवशी रात्री या परिसरात पर्यावरणप्रेमी आंदोलकांनी आंदोलन करीत प्रशासनाने लगेचच झाडे तोडायला सुरुवात केली असल्याचा आरोप केला. प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच २०० हून अधिक झाडे तोडली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकही FIR नाही

आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, ते घटनास्थळी पोहोचण्याआधीच कर्मचाऱ्यांनी २०० झाडे तोडली होती. आम्ही तिथे येत असल्याचे बघितल्यावर काही कर्मचारी तेथून पळून गेले, असे आंदोलकांनी सांगितले. कर्मचाऱ्यांनी झाडे तोडली असल्याचे बघितल्यावर आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी या ठिकाणी लावलेले कठडे तोडून परिसरात प्रवेश केला. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरे कॉलनीतील पिकनिक पॉईंट परिसरात हा सगळा गोंधळ सुरू होता.

पोलिस आमच्यासह काही स्थानिक आदिवासी लोकांना मारताहेत. काही आदिवासी मुली या घटनास्थळी बसल्या आहेत आणि त्यांचा तेथून बाहेर जाण्यास विरोध आहे. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आले असल्याचे एका आंदोलकाने सांगितले.

विधानसभेच्या प्रचारासाठी काँग्रेसने जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी

आरे कॉलनीमध्ये काही झाडे तोडल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाल्यामुळे पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.