पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकार सरसावले

सुबोध भावे आणि सई ताम्हणकर

कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण या भागातील पुरात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी आता मराठी कलाकार पुढे आले आहेत. पुराच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना लवकरच मदत करण्यात येईल. त्याचे स्वरुप दोन दिवसांत जाहीर करू, असे अभिनेता सुबोध भावे याने म्हटले आहे. आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली. त्याचबरोबर अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सुद्धा पुरात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, पण कोल्हापुरात पूरस्थिती अद्याप कायम

राज्यात कोल्हापूर, सांगलीमध्ये पूरस्थिती गंभीर आहे. लाखो लोकांचे पुरामुळे सुरक्षितस्थळी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अद्याप या दोन्ही जिल्ह्यात पंचगंगा आणि कृष्णा नदीचे पाणी आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे जाहीर केले आहे. आता मराठी कलाकारांनीही सामाजिक भान राखून स्वच्छेने मदतीचा हात पुढे केला आहे.

कोल्हापूर, सांगली, पुण्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

अभिनेता सुबोध भावे याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, फक्त पैसे देऊन काम संपणार नाही हे माहिती आहे पण किमान सुरवात होते हे महत्त्वाचं. सर्व मराठी कलाकार एकत्र येऊन पुढील काही दिवसात संकटात सापडलेल्या आमच्या बांधवांसाठी निश्चित आणि ठोस अशा जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध करून देतील. अधिक माहिती पुढील २ दिवसात.