पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठा आरक्षण : वैद्यकीय प्रवेशासाठी सरकार वटहुकूम आणण्याच्या प्रयत्नात

संग्रहित छायाचित्र

पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय विद्याशाखेला मराठा आरक्षणामुळे प्रवेश मिळणाऱ्या मराठा समाजातील २५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी वटहुकूम आणण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेली याचिका गेल्या आठवड्यात फेटाळण्यात आली होती. यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी आरक्षण लागू होणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे आता वटहुकूम आणण्याचा सरकार विचार करीत आहे.

सरकारला फसवायचंच होतं, मराठा आरक्षणावरुन राज ठाकरेंची टीका

मराठा आरक्षणामुळे देण्यात आलेले प्रवेश सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नव्याने प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू होईल. या सगळ्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सरकारने त्यावर तोडगा काढला आहे. पण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे सरकारला आपला निर्णय जाहीर करता येत नाही. सरकारने निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे. 

या संदर्भात कोणतेही वक्तव्य करण्यास राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नकार दिला. त्यांनी केवळ एवढेच सांगितले की, विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आहे. सरकारने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे. 

वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण नाकारण्याविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की सरकार यासाठी वटहुकूम आणण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर पदव्युत्तर वैद्यकीय शाखेचा महाराष्ट्रासाठीच्या राखीव जागा वाढविण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विनंती सुद्धा केली आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, पदव्युत्तर वैद्यकीय शाखेच्या आणखी १०० जागा महाराष्ट्राच्या वाट्याला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने यासाठी केंद्र सरकारला एक पत्रही लिहिले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय प्रवेशासाठीची अंतिम तारीख २५ ऐवजी ३१ मे करावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.