पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले

मराठा क्रांती ठोक मोर्चा

मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याने आणि प्रलंबित मागण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाने मुंबईमध्ये मोर्चा काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरुन हा मोर्चा थेट मंत्रालयावर धडकणार आहे. या मोर्चामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हा मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने निघाला असता पोलिसांनी तो अडवला आहे. या मोर्च्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'नारळ'

मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने याचे स्वागत केले. मात्र आरक्षणाची अमंलबजावणी योग्य पध्दतीने झाली नसल्याच्या आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसंच, मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे अद्याप मागे घेतले नाही. राज्यातील १५ हजार मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे असल्याचे मत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.  

राहुल गांधींच्या काश्मीर दौऱ्यावर मायावती संतापल्या

दरम्यान, मराठा समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि शासनाला जाब विचारण्यासाठी मंत्रालयावर धडक मोर्चा घेऊन जात असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर, राज्य सरकारनं पुढच्या दोन दिवसांत निर्णय घ्यावा आणि मागण्या मान्य कराव्यात, असा निर्णायक इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला.

मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा हटवणार

मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या मागण्या काय आहेत?
- आंदोलन काळात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत.
- २०१४ च्या विद्यार्थ्यांच्या तात्काळ नियुक्त्या कराव्यात.
- ७२ हजार मेगाभरती आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करा.
- पीक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.
- नरेंद्र पाटील यांना तात्काळ निलंबित करा किंवा महामंडळ बरखास्त करा.

शिमलामध्ये ढगफूटी; मणिमहेश यात्रा थांबवली