पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एकजूट तुटू देऊ नका, उद्धव ठाकरेंचा मराठा समाजाला सल्ला

उद्धव ठाकरे

आरक्षणासाठीची मुंबई उच्च न्यायालयातील लढाईत यश मिळाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी आज (शनिवार) मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी मराठा मोर्चाचे समन्वयक, याचिकाकर्ते, वकील आदी उपस्थितीत होते. मराठा आरक्षण लढ्याला दिलेल्या पाठिंब्यासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ठाकरे यांचे आभार मानले. त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले. तर उद्धव ठाकरे यांनी श्रेय घेण्यासाठी काही केले नसल्याचे सांगत दिल्लीतील लढाईत संपूर्ण सहकार्य करु असे आश्वासन दिले.

मराठा आणि आर्थिक आरक्षणाच्या अंमलबजावणीवरून गोंधळात गोंधळ 

उद्धव ठाकरे यांनी मोठी लढाई जिंकल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाचे नेते आणि मराठा समाजाचे अभिनंदन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद आहे. तसेच शिवसेनेने श्रेय घेण्यासाठी काही केलेले नसल्याचे ते म्हणाले. मराठे म्हणून एकत्र येण्यापेक्षा मावळे म्हणून एकत्र या. एकजूट तुटू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. 

न्यायालयाने १३ टक्के म्हटले आहे. आपली मागणी १६ टक्क्यांची आहे. ३ टक्क्यांसाठी मार्ग निघतो का ते पाहू. न्यायालयात टिकेल असे आरक्षण देऊ असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. सरकारने शब्द पाळला आहे. सर्वोच्च न्यायालयात जाणाऱ्यांनी यात रमू नये. कोणावरही अन्याय केला जाणार नाही. सर्व गोष्टी टप्याटप्याने होतील. दिल्लीत जरी लढा गेला तर तिथेही आमचा पाठिंबा असेल.

तत्पूर्वी, याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. दिल्लीत शिवसेनेची मदत अपेक्षित असून सर्वोच्च न्यायालयात लढा देऊ. शिवसेनेच्या १८ खासदारांनी त्यासाठी साथ द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maratha kranti morcha leaders meet shiv sena chief uddhav thackeray for thanksgiving for support reservation