पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा; वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच आरक्षण

मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात राज्यभरात ५८ मूक मोर्चे काढले होते.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मुंबई हाय कोर्टाने दिलासा दिला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी आरक्षण देण्यास विरोध करणारी याचिका हाय कोर्टाने फेटाळली. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षीच आरक्षण मिळणार आहे. 

मी कशाला राजीनामा देऊ?,  त्यांनी दिला होता का?; कुमारस्वामींचा टोला

वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षण कायदा लागू करण्यास विरोध करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान एसबीई अंतर्गत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. 'वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही जरी आधी सुरु झाली असली तरी देखील आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू होते.' हा राज्य सरकारचा दावा स्विकारत मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. याचिका फेटाळल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वर्षापासून आरक्षण लागू होणार असल्याने या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

सेमीफायनलमधील पराभवानंतर कोहलीचा चाहत्यांना भावनिक संदेश