पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमच्याकडे आकडे नाहीत, कौल महायुतीच्या बाजूनेच - शरद पवार

शरद पवार

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे नाही. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही. पण भाजप-शिवसेना युतीकडे संख्याबळ आहे. जनतेने त्यांच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावे. ते सरकार स्थापन करतील, असा मला विश्वास असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले.

दिल्लीत अहमद पटेलांनी घेतली नितीन गडकरींची भेट आणि...

राज्यातील सत्तास्थापनेसाठी भाजप-शिवसेनेतील तिढा सुटला नसतानाच काही नवी समीकरणे तयार होता आहेत का, या दृष्टीने शरद पवार यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. पण शरद पवार यांनी नव्या समीकरणांबद्दल कोणतेही थेट विधान केले नाही. येत्या काही दिवसांत काय होतंय ते आम्ही बघू, एवढेच मोघम उत्तर त्यांनी दिले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलण्यासारखे फारसे काही नाही, असेही स्पष्टपणे सांगितले.

शरद पवार म्हणाले, राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. आता सरकार स्थापन करण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी व्यवस्थित सरकार बनवावे. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची सुसंधी जनतेने आम्हाला दिली आहे. आमच्याकडे आकडे असते तर आम्ही सत्ता स्थापन करण्याची वाट बघितली नसती. 

ठरल्याप्रमाणे करा एवढाच प्रस्ताव - संजय राऊत

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढविली आहे. आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आलो तरी आमचे संख्याबळ सत्तास्थापन करण्यापर्यंत पोहोचत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mandate is for BJP Shivsena we will work as responsible opposition party says sharad pawar