पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकलमध्ये केवळ रविवारी चोरी करणाऱ्या सोनसाखळी चोरास अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

लोकलमध्ये केवळ रविवारी सोनसाखळी चोरणाऱ्या चोरास रेल्वे  पोलिसांनी  अटक केली आहे. शेखर शिंदे असं या चोराचं नाव असून  तो एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षकाचं काम करायचा मात्र नुकतीच त्याची नोकरी सुटली होती. आठवड्याचे पाच दिवस तो नोकरीच्या शोधात भटकायचा तर केवळ रविवारी उपनगरीय रेल्वेमध्ये चोरी करायचा.

आधी फोन चोरला मग स्वत:चा फोटो काढला आणि नंतर.......

शिंदे पत्नी आणि दोन मुलींसोबत भोईवाडा परिसरात राहतो.  पोलिसांकडे एकापाठोपाठ एक सात सोनसाखळी चोरीला गेल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पोलिसांना या तक्रारीत खूपच साम्य आढळलं. केवळ पुरुषांच्या डब्ब्यात प्रवास करणाऱ्या महिलांच्या सोनसाखळी चोरीला जायच्या, विशेष म्हणजे या चोरी केवळ रविवारीच व्हायच्या. 

जावेद अख्तर- शबाना आझमीच्या गाडीला मुंबई- एक्स्प्रेसवेवर अपघात

अखेर पोलिसांनी सापळा रचून शिंदेला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून सात सोनसाखळ्या जप्त केल्या आहेत ज्याची किंमत २.८० लाख आहे.